गोपाल व्यास, वाशिम
वाशिमच्या शेलुबाजार परिसरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यावर भर दिला गेल्याचे पाहायला मिळत आहे. वाशिमच्या शेतकऱ्याने चक्क 5 लाख रुपयांच्या ड्रोनच्या साहाय्याने कीटकनाशकाची फवारणी केली आहे.
शेलुबाजार येथील शेतकरी शाम अग्रवाल यांनी त्यांच्या शेतामध्ये फवारणी करण्याकरीता ड्रोन आणले आहे. फवारणी पेट्रोल पंपाच्या माध्यमातून केली तर 4 ते 5 तास लागतो मात्र ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केली तर काही मिनिटांत फवारणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.
हा ड्रोन पाहण्यासाठी शेतात शेतकऱ्यांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.