पॅरालिम्पिक 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा वर्षाव; भालाफेकपटू नवदीप सिंगला सुवर्ण तर सिमरन शर्माला कांस्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. 7 सप्टेंबर (शनिवार) रोजी भारताच्या नवदीप सिंगने पुरुषांच्या भालाफेक (F41) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

Published by : shweta walge

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. 7 सप्टेंबर (शनिवार) रोजी भारताच्या नवदीप सिंगने पुरुषांच्या भालाफेक (F41) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या 200 मीटर (T12) स्पर्धेत, भारताची ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट सिमरन शर्माने कांस्यपदक जिंकले. या दोन पदकांसह पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारत 29 व्या स्थानतकावर पोहोचले आहे. भारताने आतापर्यंत 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 14 कांस्य पदके जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत सध्या १६व्या क्रमांकावर आहे.

इराणच्या खेळाडूला अंतिम सामन्यात अपात्र ठरवण्यात आले, नवदीप सिंगने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात 47.32 मीटर भालाफेक केली, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो होती. या स्पर्धेत इराणचा सदेघ सयाह बाईत (४७.६४ मी.) अव्वल असला तरी स्पर्धा संपल्यानंतर तो अपात्र ठरला. त्यामुळे भारतीय खेळाडू नवदीपला फायदा झाला आणि त्याला सुवर्णपदक मिळाले. चीनच्या पेंग्झियांग सनने (44.72 मीटर) रौप्यपदक जिंकले. तर इराकच्या विल्डन नुखैलावीने (४०.४६ मीटर) कांस्यपदक जिंकले.

दुसरीकडे, महिलांच्या 200 मीटर (T12) स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरन शर्माने 24.75 सेकंदात शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा एलियास ड्युरंडने सुवर्णपदक पटकावले. ओमराने 23.62 सेकंदात शर्यत पूर्ण केली. व्हेनेझुएलाच्या पाओला अलेजांद्रा लोपेझ पेरेझला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. पाओलाने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 24.19 सेकंद घेतले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी