व्हायरल ऑडिओ क्लिपमधले आरोप फेटाळले; बबणराव लोणीकर म्हणाले…
मात्री मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) सध्या व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ते एका वीज अभियंत्याला शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. या प्रकरणावरून लोणीकरांवर चौफेर टीका होत आहे. त्यात आता बबणराव लोणीकर यांनी माझ्याविरूद्ध कट रचल्याचा आरोप करत ऑडिओ क्लिपवर (Audio Clip) स्पष्टीकरण दिले आहे.
वीज वितरण कंपनीचे आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून मी कुठल्याही प्रकारचा फोन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लावलेला नाही.माझा संभाजीनगर येथे बंगला आहे,परंतु त्या बंगल्यावरील मीटर काढून नेले नाही.त्यामुळे मी वीज वितरण कंपनीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.त्यामुळे मी फोन करण्याचा प्रश्नच नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी दिली आहे
काही षडयंत्र रचणाऱ्या लोकांनी माझी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप (Audio Clip) समाज माध्यमांमध्ये व्हायरल केली असल्याचे लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी म्हणत, व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप माझी नसून ते माझ्याविरुद्ध रचलेले कुभांड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्य सरकारचा नाकर्तेपणा बळजबरी विरोधकावर लादण्याचा हा प्रयत्न असून वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागासह शहरी भागात घरोघरी जाऊन लोकांना धमकावत असल्याचेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी म्हटले आहे.खरेतर गेल्या दोन वर्षातील कोरोनामुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले असून अशा परिस्थिती मध्ये वीज वितरण कंपनीने वीस सक्ती करायला नको आहे परंतु आघाडी सरकार सर्व सामान्यांचे दुःख समजून घ्यायला तयार नसून अगोदरच आर्थिक कमकुवत असलेल्या वीज ग्राहकांवर अन्याय करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.