Airtel घेणार TCS ची मदत
भारतात 5जी नेटवर्क आणण्याची शर्यत सुरु झाली आहे, यात भारती एयरटेल आणि रिलायन्स जियो आघाडीवर दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एयरटेलने गुरुग्राममध्ये ट्रायल सुरु केले होते त्यातून 1Gbps चा स्पीड मिळाला होता. आता जियोला मागे टाकण्यासाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत भागेदारी केली आहे. यामुळे एयरटेलला देखील जियोप्रमाणे 'मेड इन इंडिया' 5G नेटवर्क ग्राहकांना देता येईल.
टाटा ग्रुपने एक 'अत्याधुनिक' ओ-आरएएन आधारित रेडियो आणि एनएसए/एसए कोर बनवला आहे आणि आपल्या पार्टनर्सच्या मदतीने या पूर्णपणे स्वदेशी दूरसंचार स्टॅकची जोडणी केली आहे. ही टेक्नॉलॉजी जानेवारी 2022 पासून व्यवसायिकरित्या वापरण्यासाठी उपलब्ध होईल. भारती एयरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टलचा यांनी म्हटले, '5जी आणि त्या संबंधित टेक्नॉलॉजीसाठी भारताला ग्लोबल हब बनवण्यासाठी आम्ही टाटा समूहासोबत मिळून काम करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.