“काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा हिजाब दूर करायला हवा”

“काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा हिजाब दूर करायला हवा”

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

पाच राज्यांत कॉंग्रेसचा (congress) दारूण पराभव झाला. पंजाबात सत्ता होती ते एकमेव राज्यही कॉंग्रेसने गमावल्यावर नेहमीप्रमाणे पक्षातील जी 23 गटाने उचल खाल्ली. कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी तर स्पष्ट सांगितले की, कॉंग्रेसने नेतृत्व करावे, सिब्बल हे वकील आहेत व ते आपल्या अशिलाची बाजू चोखपणे मांडत असतात, असे सामनाच्या संपादकीयमधून म्हटले आहे.

काँग्रेससारखे पक्ष आजही जळमटात अडकून पडले आहेत. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे भाजपशी वेगळ्या पद्धतीने लढावे लागेल. 'जी २३' गटात असा कोणी लढवय्या असेल तर त्यांनी दंड थोपटून पुढे यायला हरकत नाही, पण ते शक्य आहे असे वाटत नाही. काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा 'हिजाब' दूर करायला हवा, हे पहिले व परिणामांची पर्वा न करता बिनकामाच्या पुढाऱ्यांना बाजूला केले पाहिजे. पक्षाचे आणखी काय नुकसान व्हायचे राहिले आहे? काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वावीत डोके खुपसायची गरज नाही, पण समस्त विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा आणि एकजुटीचा विषय असल्यानेच आम्ही आमची मते व्यक्त केली, असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com