Abdul Samad Saifi Beaten | ”हल्ल्यात कुठलाही धर्मद्वेष नाही”, उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पष्टीकरण
गाझियाबादमध्ये 'जय श्री राम' जप करण्याची जबरदस्ती करत एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेत सहा तरुणांना करण्यात आली आहे. यासोबतच "सैफी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात कुठलाही जातीयवाद झाला नाही" असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी दिले आहे. पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर आश्चर्य व्यक्त होत आहे.
गाझियाबाद जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत काही तरुणांनी वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली आहे. एका तरुणाने त्या वृद्ध माणसाची दाढी कात्रीने कापली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. गाझियाबादच्या लोणी येथे ५ जून रोजी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पीडित अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केले, असा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेत आता उत्तर प्रदेश पोलिसांनी सहा तरुणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचाही शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सैफी यांना झालेल्या मारहाणीत कुठलाही जातीयवाद झाला नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणावर आश्चर्य व्यक्त होत आहे.