अफगाणिस्तानच्या तरुणीने मृत्यूपुर्वी बनवलेला व्हिडीओ

अफगाणिस्तानच्या तरुणीने मृत्यूपुर्वी बनवलेला व्हिडीओ

Published by :
Published on

२० वर्षानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर आपली सत्ता स्थापित केली. सत्ता स्थापनेनंतर तालिबान्यांनी शरीया हा कायदा लागू केला आहे. या कायद्यामध्ये महिलांवरती कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या अफगाणिस्तानच्या(Afghanistan) एक महिला यूट्यूबरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ त्या तरुणीने तिच्या मृत्यूपुर्वी बनवलेला आहे. या व्हिडीओमध्ये काश हे एक वाईट स्वप्न असतं. काश आम्ही एक दिवस जगलो असतो. कारण आम्हाला कामावर जाण्याची आणि स्वत:च्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. त्यासाठी तुमच्यासाठी आमचा हा अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहोत असं २० वर्षीय नजमा सोदकी(Najma Sadeqi) व्हिडीओत म्हटलं आहे.

पाहा काय आहे त्या व्हिडीओमध्ये

काबुल एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नजमाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी नजमा जे काही व्हिडीओ अपलोड करत होती. त्यात ती मित्रांसोबत मज्जामस्ती करताना, भटकंती करताना, खाण्याचे व्हिडीओ पोस्ट करत होती. परंतु तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर नजमाच्या अखेरच्या व्हिडीओत ती निराश दिसली. तिने तिच्या शेवटच्या व्हिडीओत आता रस्त्यावर चालताना भीती वाटते. माझ्या चाहत्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन तिने व्हिडीओतून केले होते.

तसेच काबुलमध्ये आता जगणं कठीण झालं आहे. विशेषत: जे लोक आनंदी आणि स्वातंत्र्य आयुष्य जगत होते. नजमा काबुलच्या एका इन्स्टिट्यूटमधून जर्नलिज्मच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत होती. नजमानं अलीकडेच अफगान इनसाइडर नावाचं यूट्यूब चॅनेल ज्वाईन केले होते. तिच्या व्हिडीओवर २ कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यापासून व्लॉगर्स आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नजमाची मैत्रिण रोहिना अफशरने तिच्या निधनाची बातमी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com