Nashik : नाशिकच्या मनमाडमध्ये 5 दिवसांनी कांदा लिलाव सुरु

Nashik : नाशिकच्या मनमाडमध्ये 5 दिवसांनी कांदा लिलाव सुरु

नाशिकच्या मनमाडमध्ये 5 दिवसांनी कांदा लिलाव सुरु झाला असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विशाल मोरे, मालेगाव

नाशिकच्या मनमाडमध्ये 5 दिवसांनी कांदा लिलाव सुरु झाला असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक मनमाड बाजार समितीमध्ये 5 दिवसांपासून ठप्प असलेले लिलाव आज पूर्ववत सुरू झाले आहेत.

लिलाव ठप्प असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. 30 ऑगस्टपर्यंत जुन्याच पद्धतीने लेव्ही कपात करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता बैठकीत नेमका काय तोडगा निघतो याकडे शेतकरी व बाजार समितीच्या सर्वच घटकांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com