बातमी बळीराजाची
सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंतेत
जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पाऊस कोसळत असल्याने त्याचा फटका शेती पिकांना बसत आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पाऊस कोसळत असल्याने त्याचा फटका शेती पिकांना बसत आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक आता पिवळे पडत आहे.
तर कपाशीचे पीक हे सुद्धा आता करपून जात आहे. अनेक ठिकाणी सखल भागात शेतामध्ये पाणी साचले आहे . अशा परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले असून पीक पाण्याखाली गेली आहे.
कृषी विभाग अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांनी केली आहे.