Wardha : वर्ध्यात अवैध खतांचा मोठा साठा जप्त
भूपेश बारंगे, वर्धा
वर्ध्यात युरिया खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजर सुरू आहे. आर्वी, कारंजा तालुक्यातील तीन गोदामामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकून अनधिकृत असलेल्या गोदामात 4635 बॅग युरिया खतांचा आढळून आल्या आहे.आर्वी आणि कारंजा तालुक्यातील काही ठिकाणी गोदामामध्ये युरियाची साठेबाजी केल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली माहिती मिळाली होती.
या कारवाई मध्ये टेक्निकल ग्रेड चा 12 लाख 35 हजाराचा युरिया खतांच्या 4635 बॅग जप्त केल्या आहेत. हा युरिया औद्योगिक वापरासाठी केला जातो मात्र हा युरिया शेतीसाठी विक्रीसाठी तर ठेवला नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत आहे. औद्योगिक वसाहत नसताना ही साठेबाजी कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच तालुक्यातील पिंपळखुटा येथील गोदामात 113 बॅग युरिया आढळून आला तिने गोदाम सील करून युरियाचे नमुने अमरावती येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे. या धडक कारवाईमध्ये कृषी विभागाने केलेल्या कारवाईत 12 लाख 35 हजार दोनशे रुपयांच्या 4635 युरिया बॅग जप्त केल्या आहे.
ही कारवाई पुण्यातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विभाग अधिकारी संजय बोबनोटे, नागपूरचे तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, आर्वीच्या उपविभागीय कृषी अधिकारी सुमित्रा वायवड, जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी प्रमोद पेटकर, आर्वी पंचायत समितीचे कृषी अधिकारी रवी दुबे यांनी केली.