ई-केवायसीची वेबसाईट चालत नसल्याने शेतकरी कापूस, सोयाबीनच्या अनुदानाला मुकणार?

ई-केवायसीची वेबसाईट चालत नसल्याने शेतकरी कापूस, सोयाबीनच्या अनुदानाला मुकणार?

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शासनाने ई-केवायसी अनिवार्य केल्याने ई-केवायसी न केलेले पैठण तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

सुरेश वायभट | पैठण: कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शासनाने ई-केवायसी अनिवार्य केल्याने ई-केवायसी न केलेले पैठण तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

तालुक्यात सन 2023 मध्ये नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना व ई-पीक पाहणी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र केले होते. ई-केवायसीची वेबसाईट चालत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन ई-केवायसीची वेबसाईट सुरुळीत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माऊली मुळे यांनी केली आहे.

अनुदानासाठी शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे मात्र अद्यापही तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांना याबाबत कुठलीच माहिती नसल्याने कृषीसाह्यकांनी याबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे, मात्र असे होतांना दिसत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com