राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर परिणाम; प्रतिक्विंटल सरासरी 'एवढ्या' रुपयांची वाढ

राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर परिणाम; प्रतिक्विंटल सरासरी 'एवढ्या' रुपयांची वाढ

राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर परिणाम झाला आहे. हमीभाव खरेदी होणार असल्याने बाजारात सोयाबीन वधारलं आहे.
Published on

राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर परिणाम झाला आहे. हमीभाव खरेदी होणार असल्याने बाजारात सोयाबीन वधारलं आहे. प्रतिक्विंटल सरासरी 200 ते 300 रुपयांची वाढ झालेली आहे. आज दिवसभरात समजणार सोयाबीनच्या निर्णयाचा बाजारात काय परिणाम होणार? सोयाबीनचे भाव 4200 ते 4550 रुपये क्विंटलवर सोयाबीनची खरेदी होणार आहे.

वाशिम सह जिल्ह्यातील रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये केंद्र सरकार 4892 रुपये प्रति क्विंटल हमी भावाने 90 दिवस सोयाबीन खरेदी करणार असल्याने या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढून 4200 ते 4550 रुपये प्रति क्विंटल झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय कृषी विभागाने समाजमाध्यमावर माहिती देत कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील सोयाबीन खरेदीची माहिती दिली आहे. या तीन राज्यांत किमान हमीभाव योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली असून या योजनेअंतर्गत ‘नाफेड’ आणि ‘एससीसीएफ’सारख्या नोडल एजन्सींमार्फत तसेच राज्यस्तरीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी केले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com