बातमी बळीराजाची
नाशिक जिल्ह्यात मका पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती
नाशिक जिल्ह्यात मका पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.
विशाल मोरे, मालेगाव
नाशिक जिल्ह्यात मका पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. मागील चार ते पाच वर्षापासून कांदा अन् द्राक्षांचा जिल्हा आता मकाचा जिल्हा बनला आहे. बाजरीकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते.
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी नंतर पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या होत्या. जिल्ह्यात तब्बल ५० टक्के क्षेत्र हे मका त्याच्याखालोखाल सोयाबीन आणि कपाशीने व्यापले असल्याचे दिसत आहे. येवला, नांदगाव, मालेगाव, सटाण्यात मक्याची सर्वाधिक पेरणी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.