शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यभरात खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो 'एवढ्या' रुपयांची वाढ
चालू पीक वर्षासाठी निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीच्या खाली दर घसरल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप तेलबियांसाठी चांगला भाव मिळावा यासाठी भारत सरकारने शुक्रवारी संध्याकाळी स्वयंपाकाच्या तेलावरील आयात शुल्कात वाढ केली. आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावर वर आयात शुल्क ही 10 टक्क्यांनी वाढवलं आहे.
खाद्या तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याच समोरं आलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसला आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसला आहे. मात्र, यानंतर दुसरीकडं खाद्य तेलाच्या किंमती वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.
नवीन शुल्क दर गेल्या शनिवारपासून लागू झाले. देशांतर्गत तेल उत्पादकांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, देशाला तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक स्वावलंबी होण्यासाठी हा निर्णय मदत करेल. देशांतर्गत तेल उत्पादनात वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी चांगली किंमत मिळण्याची शक्यता आहे, संभाव्यत: त्यांचे उत्पन्न वाढेल.
कोणत्या तेलाला किती दर?
पहिला दर आजचा दर
सोयाबीन - 110 130
शेंगदाना - 175 185
सूर्यफुल - 115 130