Maharashtra Corona | दिलासा ! ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित; रिकव्हरी रेटमध्ये वाढ

Maharashtra Corona | दिलासा ! ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित; रिकव्हरी रेटमध्ये वाढ

Published by :
Published on

राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रिया सुरू असताना कोरोनाबाधित रुग्णसंख्येतही घट होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य विभागासाठी हा काहीसा दिलासा आहे.

गेल्या २४ तासांमध्ये राज्यभरात १४ हजार ३४७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १९८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com