Covid-19 updates
मुंबईत आज 9 हजार 200 कोरोनाबाधित
मुंबईत आज 9 हजार 200 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णसंख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. तर आज 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत 90 हजार 333 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 9 हजार 200 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 5 लाख 898 वर पोहोचली आहे. 5 हजार 99 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण 3 लाख 97 हजार 613 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट 79 टक्क्यांपर्यत पोहोचला आहे. तसेच आज 35 रुग्णांचा मृत्यु झाला असून एकूण 11 हजार 909 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.