Phone tapping case : नाना पटोले, बच्चू कडू यांचे 60 दिवस फोन रेकॉर्डिंग
पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त आणि सध्याच्या CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या विरोधात पुण्यात बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग (Phone tapping) केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील अनेक राजकीय महत्वाच्या लोकांचे फोन टॉपींग (Phone tapping) करुन गोपनीय माहीती उघड केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार.
याचसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade), माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आणि मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे वेगवेगळ्या नावाने साठ दिवस फोन टॅपिंग केल्याच फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात तत्कालीन अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्तसह, उपायुक्त असण्याची शक्यता आहे. अपर गृह सचिवांकडे या चौघांचे सहा मोबाइल क्रमांक टॅपिंगसाठी पाठविताना 'कस्टमर ऍप्लिकेशन फॉर्म' (सीएएफ) जोडले नसल्यामुळे हे नंबर कोणाच्या नावावर आहेत, हे समजू शकले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात तार अधिनियमानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी काही राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्यांचे संभाषण भाजप सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता.
फोन टॅपिंगचा कालावधी
- नाना पटोले- १८ सप्टेंबर २०१७ ते १४ नोव्हेंबर २०१७
- बच्चू कडू- १८ सप्टेंबर २०१७ ते १४ नोव्हेंबर २०१७
- संजय काकडे- १३ नोव्हेंबर २०१७ ते ९ जानेवारी २०१८
- आशिष देखमुख- १३ नोव्हेंबर २०१७ ते ९ जानेवारी २०१८