वाघाच्या अवयवाची तस्करी करणारे 5 आरोपी ताब्यात; नागपूर वनविभागाची कारवाई

वाघाच्या अवयवाची तस्करी करणारे 5 आरोपी ताब्यात; नागपूर वनविभागाची कारवाई

Published by :
Published on

अनिल ठाकरे | चंद्रपूर | वाघाचे दात आणि नखाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून सहा दात, 18 नखे जप्त करण्यात आली आहेत. अटकेत असलेले आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिकार करण्यात आलेला वाघ नागभिड तालुक्यातील आलेवाही वनक्षेत्रातील होता, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. काही दिवसापुर्वी जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात वाघाचा चमड्यासह सहा आरोपींना पकडण्यात आले होते.

वाघाचा अवयवांची तस्करी होत असल्याची गुप्त माहीती नागपूर वानविभागाला मिळाली. नागपूर वनविभागाचा दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी सापळा रचला. उमरेडच्या बसस्थानक परिसरात वाघाचे सहा दात आणि 18 नखासहीत तीन आरोपींना अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींचा माहिती वरून दोन नावे समोर आली. त्या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. ताराचंद नेवारे, दिनेश कुंभले, अजय राजुजी भानारकर, प्रेमचंद वाघाडे, राजू कुळमेथे अशी आरोपींची नावे आहेत. अटकेत असलेले आरोपी तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटा अंतर्गत येणाऱ्या गावातील आहेत. अटकेत असलेला राजु कुळमेथे हा सयुक्त वन समितीचा अध्यक्ष आहे. सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा) पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात एन.जी.चांदेकर, कोमल गजरे, चौगुले, अगळे, कॉपले, पेंदाम, नरवास, श्रीरामे, हेडावू यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com