देशात ५२,२५६ नवे कोरोना रुग्ण; गेल्या ८८ दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

देशात ५२,२५६ नवे कोरोना रुग्ण; गेल्या ८८ दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

Published by :
Published on

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. ICMR च्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात ३९,२४,०७,७८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासात १३,८८,६९९ करोना चाचण्या करण्यात आल्या.

रविवारी देशात ५२,२५६ नवीन कोरोना रुग्ण सापडले, तर ७७,१९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट होतं असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात काल (रविवार) १४२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या बाधितांची संख्या ८८ दिवसांपासून सर्वाधिक कमी आहे. यापूर्वी २३ मार्चला ४७,२३९ रूग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com