आतंकवाद्यांचा 24 तासांमध्ये 4 वेळा काश्मिरी पंडितावर हल्ला
कश्मीर( Kashmir) मधील शोपियां या जिल्ह्यामध्ये आतंकवाद्यांनी (Terrorists) एका कश्मीरी पंडिताच्या दुकानावर जाऊन त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यामध्ये चोटिगाम येथे राहणाऱ्या बालकृष्ण हा जखमी झाला असून त्याच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. तिथे त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
सैन्यअधिकाऱ्यांनी (Army Official) असे सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांना कश्मीरी पंडित याच्या दुकानावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यापूर्वी श्रीनगर मधील मैसूमा भागात आतंकवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार करत हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. त्या भागामध्ये नाकाबंदी करून हल्लेखोर आतंकवाद्यांना शोधण्याचे काम सुरू आहे.
सीआरपीएफ (CRPF) जवानांवर हल्ला करण्यापूर्वी पुलवामा येथील दोन मजुरांवर देखील गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेले आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ट्वीट (Tweet) करून या हल्ल्याची निंदा केली आहे व या घटनेचा निषेध केला आहे.