गोंदियात मलेरियाचे 394 रुग्ण, तर एका मुलीचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे मलेरिया, डेंग्यूसह इतर आजारांची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत असून, नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागानेसुध्दा साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान,या जिल्ह्यात मलेरिया चे तब्बल 394 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे जिल्हाने हा आकड़ा केवळ 9 महिन्यात गाठला आहे. तर देवरी तालुक्यातिल एका 17 वर्षीय मुलीचा मलेरियाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आदिवासी बहुल भागात आहेत.
यात सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यातिल असून त्यानंतर देवरी, मोरगाव अर्जुनी, सड़क अर्जुनी येथे आहेत. दरवर्षी प्रमाणे गोंदिया मलेरिया विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात मलेरिया डेंग्यू बाबत जनजागृति केली जाते मात्र जिल्ह्यात रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता विभाग कमी पड़त असल्याचे दिसत आहे.