Corona Update | तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मालाड कोविड सेंटर २१७० बेडसह सज्ज

Corona Update | तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मालाड कोविड सेंटर २१७० बेडसह सज्ज

Published by :
Published on

कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे (MMRDA) दोन महिन्यांतच मालाडच्या वलनाई गाव येथे २१७० खाटांचे रुग्णालय बांधून महानगरपालिकेकडे सुपूर्त केले आहे. "समर्पित कोविड-१९ रुग्णालय" जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले असून ते अग्निरोधक आणि पर्यावरणास अनुकूल आहे. या ठिकाणी २१७० खाटांच्या कोविड रूग्णापैकी ७० टक्के चांगले ऑक्सिजन बेडस व २०० आयसीसीयू बेड असणार आहे.

  • रूग्णालयात १९० बेडचे इंटेन्सिव्ह केअर युनिट,
  • ऑक्सिजन सुविधायुक्त १५३६ बेड्स,
  • मुलांसाठी इंटेन्सिव्ह केअर युनिट,
  • २० बेडचे डायलिसिस युनिट,
  • ४० बेडचे ट्रायजेज
  • ३८४ बेडस विलगीकरण रूम

हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी पॅथॉलॉजी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली असून पोर्टेबल एक्स-रे, सीटी स्कॅनर, ईसीजी मशीन या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासोबत लिक्विड ऑक्सिजनच्या ४ टाक्या बसविण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने २४० सीसीटीव्ही कॅमेरे देखील स्थापित केले आहेत. रूग्णाच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. डॉक्टर आणि प्रशासकीय कामांसाठी एक खोली तयार करण्यात आली असून तेथे उत्कृष्ट सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com