Paralympics 2024: धरमबीरने सुवर्णपदक आणि प्रणवने जिंकले पॅरिसमध्ये रौप्यपदक

Paralympics 2024: धरमबीरने सुवर्णपदक आणि प्रणवने जिंकले पॅरिसमध्ये रौप्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. धरमबीरने बुधवारी पुरुषांच्या क्लब थ्रो एफ 51 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. धरमबीरने बुधवारी पुरुषांच्या क्लब थ्रो एफ 51 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने पॅरिसमध्ये 34.92 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून तिरंगा फडकावला. तर त्याचा सहकारी प्रणव सुरमाने 34.59 च्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले. मात्र, भारताचा अमित कुमार या स्पर्धेत 10व्या स्थानावर राहिला. पॅरालिम्पिकमध्ये क्लब थ्रो प्रकारात भारताने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्बियाच्या जेल्को दिमित्रीजेविकने 34.18 च्या सर्वोत्तम प्रयत्नाने कांस्यपदक जिंकले.

धरमबीरने भारताला पाचवे सुवर्ण मिळवून दिले. त्याचे सलग चार फेक अवैध ठरले. मात्र, पाचव्यांदा त्याने 34.92 च्या सर्वोत्तम थ्रोसह शानदार पुनरागमन केले. यानंतर सहाव्या प्रयत्नात त्याने 31.59 अशी थ्रो केली. धरमबीरने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याआधी बुधवारी तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदक जिंकले होते. धरमबीरच्या सुवर्णासह, भारताने टोकियोमध्ये जिंकलेल्या पाच सुवर्ण पदकांची बरोबरी केली.

त्याने 34.59 आणि 34.19 असे दोन्ही सुरुवातीचे थ्रो केले. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आले नाही. भारतीय खेळाडूचा चौथा थ्रो 34.50 होता तर पाचवा थ्रो 33.90 होता. त्याच वेळी, सहाव्या प्रयत्नात त्याने 33.70 मीटर अंतर कापले. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रणवने रौप्यपदक जिंकले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची 24 पदके आहेत. यामध्ये पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि 10 कांस्यपदकांचा समावेश आहे. यासह भारत पॅरालिम्पिक पदकतालिकेत 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. ही पदकांची संख्या आतापर्यंतची सर्वोत्तम आहे. टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदके जिंकली. भारताने यावर्षी 25 चे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा विक्रम केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com