Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का! महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये मानसी जोशी पराभूत

Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का! महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये मानसी जोशी पराभूत

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात झाली
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात झाली कारण मानसी जोशी आणि मनदीप कौर यांना महिला एकेरीच्या SL3 गट टप्प्यातील पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.

मानसी, अ गटात, जागतिक चॅम्पियनशिप 2019 ची सुवर्णपदक विजेती, इंडोनेशियाच्या कोंटिया इखितर स्याकुरोहशी झुंज दिली. भारतीय खेळाडूने पहिला गेम जिंकूनही, स्याकुरोहने पुढच्या दोन सेटमध्ये मात करत पहिल्या फेरीत मानसीचा (21-16, 13-21, 18-21) पराभव केला.

भारताच्या नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांना गुरुवारी येथे पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मिश्र दुहेरीच्या (SL3-SU5) पहिल्या गटात विजय मिळवला. त्यांनी या सामन्यात सहकारी सुहास यथीराज आणि पलक कोहली यांच्यावर ३१ मिनिटांत 21-14 व 21-17 असा विजय मिळवला. तेच मानसी जोशीने महिला एकेरी SL3 गटाच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com