Another witness in the 2008 Malegaon bomb blast case was killed
Another witness in the 2008 Malegaon bomb blast case was killed

2008 Malegaon bomb blast case : मालेगाव ब्लास्ट 2008 खटल्यातील 18 वा साक्षीदार फितूर

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

सन 2008 च्या मालेगाव ब्लास्ट प्रकरणी (2008 Malegaon bomb blast case) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष एनआयए (NIA) कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार फितूर होण्याचं सत्र सुरूच आहे. 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण पर खटल्यातील आणखी एक साक्षीदार फितुर झालं. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयासमोर साक्षीदाराने आपले जवाब मागे घेतले.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसने एकूण 226 जणांचे जबाब नोंदवले, त्यापैकी 18 साक्षीदार फितूर म्हणजेच hostile झाले.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट ( bomb blast case) झाला होता. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे.

यातील दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून सर्व आरोपी जामीनवर बाहेर आहेत. माध्यमांनी या खटल्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे वादविवाद, मुलाखत, चर्चा करू नयेत, साक्षीदारांची नावे, पत्ता उघड करू नये, इत्यादी बंधने घालत प्रवेश दिला होता. सध्या याचं काही माध्यमं उल्लंघन करत असल्याचा आरोप करत पुरोहित यांनी हा खटला इन कॅमेरा चालवण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com