यूएईमधील मुसाफा भागात ड्रोन हल्ला; 2 भारतीय आणि 1 पाकिस्तानी अशा एकूण ३ नागरिकांचा मृत्यू
अबुधाबी विमानतळ परीसरात ड्रोन हल्ला झाल्याची घटना घडली.या घटनेत कोणतीही वित्तीयहानी झाली नाही, मात्र जिवितहानी झाली आहे. या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी अशा एकूण ३ नागरिकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्या 6 इतकी आहे.
अबुधाबी विमानतळावर सोमवारी सकाळी आग लागल्याची माहिती मिळते आहे. ही आग आपोआप लागलेली नसून येमेनच्या हुथी बंडखोरांनी मुसाफा भागात तीन ऑईल टँकरवर ड्रोन टाकले त्यामुळे, तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला व आग अबुधाबी विमानतळापर्यंत पोहोचली. या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी अशा एकूण ३ नागरिकांचा मृत्यू झाला तर जखमींची संख्या 6 इतकी आहे.
अबू धाबी पोलिसांच्या म्हणण्यानूसार, 'अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचली कारण, तो स्फोट अतिशय प्रचंड होता.' विमानतळावर कोणतीही हानी झालेली नाही. मात्र या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी अशा एकूण ३ नागरिकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्या 6 इतकी आहे.