१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण; कोविनवर करता येणार नोंदणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचान निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आता लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे.त्यामुळे मुलांना दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. येत्या जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते.
यानंतर आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले १ जानेवारीपासून CoWIN अॅपवर लसीसाठी नोंदणी करू शकतील. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे.